Type Here to Get Search Results !

रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कुशल व अकुशल मजुरांना त्यांच्या मजुरीची देयके कायद्यातील निर्धारित कालावधीत मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यात कोणताही विलंब होऊ नये, अशी ठाम मागणी आ. सुधीर मुनगंटीवार


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :- *राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कुशल व अकुशल मजुरांना त्यांच्या मजुरीची देयके कायद्यातील निर्धारित कालावधीत मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यात कोणताही विलंब होऊ नये, अशी ठाम मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेद्वारे केली. नियमांनुसार मजुरांची देयके वेळेत अदा करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.*


*आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला उत्तर देताना रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी हा मुद्दा रास्त असल्याचे मान्य केले. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून रोजगार हमी योजनेतील उर्वरित थकीत निधी लवकरच वर्ग करण्यात येईल आणि मजुरांच्या देयकांबाबत नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.*

Post a Comment

0 Comments