Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ जनतेचा आवाज नसतो, तर संकटाच्या क्षणी आधार देणारा विश्वास असतो: आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


चंद्रपूर :- लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ जनतेचा आवाज नसतो, तर संकटाच्या क्षणी आधार देणारा विश्वास असतो. जालना येथील एसआरपीएफ पोलीस अंमलदाराची डीजी गृहअग्रीम कर्जाची तब्बल १९ लाख रुपयांची रक्कम फसवणूक करून बळकावण्यात आली होती. ही वेदनादायी बाब माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तातडीने कठोर कारवाईचे निर्देश दिले.


आ.मुनगंटीवार यांच्या संवेदनशील हस्तक्षेप आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पोलीस यंत्रणा तत्काळ कामाला लागली. सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या पथकाने अवघ्या २४ तासांत संपूर्ण १९ लाख रुपयांची रक्कम संबंधित व्यक्तीकडून परत मिळवून दिली. जनतेच्या अडचणी स्वतःच्या समजून त्यावर तातडीने न्याय मिळवून देणे, हीच खऱ्या लोकनेत्याची ओळख आहे.आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा लोकसेवेच्या वचनाला न्याय देत जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरविणाऱ्या लोकनेतृत्वाचा आदर्श घालून दिला.*

Post a Comment

0 Comments