पावसामध्ये आता किती तारखेपर्यंत पडणार खंड !
✍️ भवन लिल्हारे भंडारा , गोंदिया जिल्हा प्रतिनिधी 📱 मो.नं.9373472847 / 8888519894
भंडारा : ( दिनांक ९ जुलै २०२६ ) जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या मान्सूनचा वेग आता मंदावणार आहे. हवामानातील मोठ्या बदलांमुळे राज्यात मान्सूनला 'ब्रेक' लागण्याची शक्यता असून, ८ जुलैच्या दुपारपासूनच पावसाचा जोर कमी होणार आहे.
हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खंड २० जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे. वाहणारे अफगाणिस्तानकडून कोरडे वारे गुजरातच्या दिशेने सरकत असून, ते कोकण व उर्वरित महाराष्ट्रावर घोंघावणार आहेत. या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता कमी होईल.
प्रशांत महासागरात तयार झालेल्या 'एल निनो'चा प्रभात अधिक तीव्र होत आहे. या दोन्ही घटकांमुळे अरबी समुद्रासह कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राच्या इतर भागांत मान्सूनचे ढग तयार होण्यास बाधा निर्माण झाली आहे. ढगच तयार होणार नसल्याने पावसाची सक्रियता कमी होईल. ८ जुलैच्या दुपारपासूनच पावसाचा वेग कमी होईल. पाऊस पूर्णपणे गायब होणार नाही.
अधून-मधून पावसाच्या एक-दोन मोठ्या सरी नक्कीच कोसळतील; मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात जसा मुसळधार पाऊस झाला, तसा प्रभाव व वेग आता बघायला मिळणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार २० जुलैपर्यंत राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यानंतर हवामानात जे बदल होतील, त्यानुसारच मान्सूनच्या पुढील सक्रियतेची दिशा ठरेल.
राज्यातील पाऊस
◼️ सरासरी २८२.३ मिमी एवढा पडतो.
◼️ प्रत्यक्ष २९०.७ मिमी इतका झाला.
१ जून ते ७ जुलै
◼️ सरासरीच्या तुलनेत १०२.९८%
जुलै महिन्यातील स्थिती
◼️ जुलैचा सरासरी पाऊस - ७४.७ मिमी.
◼️ ७ जुलैपर्यंतचा पाऊस - १६४.८ मिमी.
◼️ सरासरीच्या तुलनेत - २२०.६%
पेरणीची घाई नको
ज्या भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Post a Comment
0 Comments