अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
पालघर : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित पालघर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन जिल्हा कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी श्री. संदिप रावते यांची, तर जिल्हा सचिवपदी श्री. सुभाष झिरवाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण विषयाचा दर्जा उंचावणे, शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि संघटन अधिक सक्षम करणे या उद्देशाने राज्यभर जिल्हानिहाय कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यात ही निवड प्रक्रिया पार पडली.
ही निवड प्रक्रिया जिल्हा मार्गदर्शक श्री. जितेश भोये, श्री. निलेश गायकवाड, श्री. पांडुरंग भरसट आणि श्री. घनश्याम परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महासंघाचे संस्थापक श्री. संदीप मनोरे आणि राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली.
नूतन कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. दीपक भुसारा व श्रीमती वर्षा धोडी, कार्याध्यक्षपदी श्री. आलेश हाडळ, सहसचिवपदी श्री. सुजित वाघात आणि श्री. सागर घायाळ, खजिनदारपदी श्री. विनीत माहला, जिल्हा संघटकपदी श्री. संदिप निखळे, श्री. मगन चौधरी, श्री. प्रकाश रायात, श्री. रविंद्र गिंभल आणि श्री. निलेश कांटेला यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा सदस्य म्हणून कु. सविता घाटाल, श्री. संदिप पालवा, श्री. निलेश रावत्या, श्री. दिपक पवार, श्री. विजय डावरे, श्री. शंकर चौधरी, श्री. अविनाश भुसारा, श्री. योगेश धिंडे, श्री. महेश कामडी, श्री. ईश्वर हडबाल, श्री. सुरेश उंबरसाडा, श्री. नितीन टोकरे, श्री. अनिल बोलाडा, श्री. गणपत कोम आणि श्रीमती प्रमिला बोबा यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी श्री. सुधाकर बेलकर, तर जिल्हा प्रसिद्धी सचिवपदी श्री. सचिन गिंभल आणि श्री. विष्णू फडवले यांची निवड झाली.
निवडीनंतर पालघर जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि क्रीडाप्रेमींकडून नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले असून, शारीरिक शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment
0 Comments