Type Here to Get Search Results !

जालना जिल्ह्यातील अंबड वडिगोद्री येथे एसटी बसेसचा समोरासमोर भीषण अपघात




 शाळेतील विद्यार्थ्यांसह ३० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी! 


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


जालना :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की जालना जिल्ह्यातील अंबड-वडिगोद्री महामार्गावर शहापूर येथील गल्हाटी नदीच्या पुलावर आज सकाळी दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली की दोन्ही बसेस भरधाव वेगाने असल्यामुळे हा अपघात झाला हा अपघात एव्हढा भीषण झाला आहे की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसानझालेले आहे धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसेसच्या पुढच्या भागाचा चक्कनाचूर झाला आहे.


शाळेचे विद्यार्थी जखमी सकाळी शाळेच्या वेळेत अपघात झाल्यामुळे बसमधील अनेक शाळकरी विद्यार्थी आणि दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहे.


स्थानिकांनी मदत करण्यासाठी अपघात स्थळा कडे धाव घेऊन शहापूर येथील स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले व रुग्णालयात हलवलेव त्या नंतर उपचार सुरू सर्व जखमींना उपचारासाठी अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या जखमी इलाज सुरु करण्यात आले आहे .


प्रशासनाने गतिरोधक आणि रस्त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी जनतेची मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments