Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, आपत्ती व्यवस्थापन व मदतकार्याचा आढावा घेतला.




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


अहिल्यानगर :- मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुंबई शहर, नाशिक, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांमधील पावसाची परिस्थिती जाणून घेतली. आपत्कालीन परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून, आपत्तीत अडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.


पर्यटनस्थळांवरील सुरक्षितता, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि मुंबई-अहमदाबाद या महामार्गांवरील वाहतूक, आषाढी वारीनिमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याची व्यवस्था, कोयना धरणाची पाणी परिस्थिती, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीस्थिती आदीबाबतची माहिती घेतली. समुद्राला दुपारी ४.०० ते ४.३० दरम्यान येणारी भरती लक्षात घेता एनडीआरएफ व एसडीआरएफ यांनी अलर्ट मोडवर राहावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. 


यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव (नगरविकास) के. एच. गोविंदराज, प्रधान सचिव (जलसंपदा) एकनाथ डवले,मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सचिव (आरोग्य) ई. रविंद्रन आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments