Type Here to Get Search Results !

वारकरी भाविकांच्या आरोग्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजनांसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे यांची प्रत्यक्ष भेट




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


पंढरपूर :- आषाढीवारी साठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या आरोग्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजनांसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची सखोल पाहणी केली. वारीदरम्यान कोणत्याही भाविकाला उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागू नये, प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत तसेच संपूर्ण आरोग्ययंत्रणा २४ तास सतर्क ठेवावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर आपत्कालीन वैद्यकीयसेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू), औषधसाठा, डॉक्टर व परिचारिकांची उपलब्धता, वैद्यकीय मनुष्यबळ, रुग्ण व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्था तसेच वारकरी भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आषाढी वारीदरम्यान राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी उपजिल्हा रुग्णालयासह विविध आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून यंदाची वारी आरोग्यदायी, सुरक्षित आणि निर्विघ्न पार पाडावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments