Type Here to Get Search Results !

अहिल्यानगर दौऱ्यात डॉ.निलेश राणे यांची पोलीस अधीक्षक श्री.मुमक्का सुदर्शन यांना सदिच्छा भेट




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


अहिल्यानगर :- अहिल्यानगर दौऱ्यावर असताना डॉ.निलेश राणे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) श्री. मुमक्का सुदर्शन यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


भेटीदरम्यान कायदा व सुव्यवस्था, जनसहभाग, सामाजिक उपक्रम तसेच जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समाजाभिमुख प्रशासन, लोकसहभाग आणि नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.


यावेळी डॉ.निलेश राणे यांनी श्री.मुमक्का सुदर्शन यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि जनतेप्रती संवेदनशील कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखली जात असून, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.


भेटीच्या शेवटी डॉ.राणे यांनी श्री.मुमक्का सुदर्शन यांना आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उत्तरोत्तर यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.


 *फोटो मध्ये :* 

अहिल्यानगर येथे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) श्री.मुमक्का सुदर्शन यांची सदिच्छा भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना डॉ.निलेश राणे.

Post a Comment

0 Comments