त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो
9096817953
जादुटोनाच्या माध्यमातून 'माथाडी कामगार' म्हणून मुलाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी, आध्यात्मिक उपचारक असल्याचे भासवणाऱ्या एका व्यक्तीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.संजय रामदास शिरोडे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो तुकडोजी चौकात एमएसईबी कार्यालयात चौकीदार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला मजुरीचे काम करीत असून तिचे पती यांची संजय शिरोडे याच्याशी पहिली भेट १६ जून रोजी म्हाळगीनगर दुय्यम निबंधक कार्यालयात झाली. यावेळी पीडितेच्या पतीला आरोपीने २१ वर्षीय मुलाला 'माथाडी कामगार' म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने त्यांच्या घरी भेट दिली आणि नोकरी मिळवून देण्यासाठी एका विशेष पूजेची आवश्यकता असल्याचे सांगितले२७ जून रोजी आरोपी पूजेचे साहित्य घेऊन पुन्हा त्यांच्या घरी गेला. पूजा सुरू असताना, त्याने महिलेच्या पतीला आणि मुलाला जवळच्या झाडांची मुळे आणण्यासाठी बाहेर पाठवले. घरात इतर कोणीही राहू नये, असा आग्रह त्याने धरला. महिला घरात एकटी घरात असताना, त्याने तिला बळजबरीने बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
यानंतर तो सातत्याने तिला त्याच्या मागण्या मान्य केल्या तर तो मुलाला नोकरी मिळवून देईल, कुटुंबात समृद्धी आणेल आणि त्यांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करेल, असे आश्वासन आरोपीने दिले होते. तिने विरोध केला. त्यावरून आरोपीने त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि ही घटना कोणाला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी ती महिला काही दिवस गप्प राहिली.दरम्यान ५ जुलै रोजी आरोपीने कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधल्यानंतर तिने अखेर आपल्या पतीला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्या दाम्पत्याने हुडकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयासमोर सादर करीत, सखोल तपास सुरू केला. आरोपीने अशाच प्रकारे इतर कुटुंबांनाही लक्ष्य केले होते का, याची पडताळणी पोलिस करत आहेत.

Post a Comment
0 Comments