राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री राहावे!
✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847/8888519894
भंडारा (गोंदिया ) : ( दिनांक १२ जुलै २०२६ ) राजकारणाच्या पटावर सध्या रंगलेल्या तर्क-वितर्कांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. रविवारी गोंदियातील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील विविध घडामोडींवर भूमिका मांडताना संयमित, परंतु स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले.
*फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास’*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पटेल म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत. शेतकरी, गोरगरीब, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्री राहावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी सूचित केले.
*जम्मू-काश्मीरबाबत अफवांना फाटा*
जम्मू-काश्मीरमधील सरकार पाडण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना पटेल यांनी अशा दाव्यांना स्पष्ट शब्दांत नाकारले. नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झाले आहे. एखाद्या पक्षातील अंतर्गत मतभेद किंवा आमदारांच्या हालचालींसाठी प्रत्येकवेळी भाजपला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Post a Comment
0 Comments