Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शिक्षक भरतीसाठी भंडाऱ्यात जनआक्रोश! जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला!


✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा , गोंदिया📱 मो. नं.9373472847 /  8888519894


भंडारा : ( दिनांक ८ जुलै २०२६) ७०० रिक्त शिक्षक पदे भरा... विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा!" या घोषणांनी आज भंडारा शहर दणाणून गेले. दसरा मैदानातून निघालेला भव्य जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हा परिषद पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , सदस्य, शिक्षक, पालक, शेतकरी, विद्यार्थी , विद्यार्थिनी आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.


भंडारा जिल्ह्यातील ७०० शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, ५०  शिक्षकांविना असलेल्या शाळांना शिक्षक द्यावेत आणि ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांनी पालकांसह जिल्ह्यातील वरिष्ठ नेते सह जिल्हाधिकारी यांना दिले.


जिल्हाधिकारी यांनी निवेदन घेतांना दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा शासनास पाठऊन लवकरात लवकर शिक्षक भरती करनार असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments