Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री फडनवीस यांच्यासह शरद पवार , नारायण राणे उपस्थित ! सीमाप्रश्नी महावाची बैठक! काय ठरले ?


✍️ भवन लिल्हारे 📱 मो. नं. 9373472847 / 8888519894


भंडारा ( मुंबई ) : (दिनांक ८ जुलै २०२६) गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. ऑपरेशन टायगर यशस्वीपणे राबवल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शरद पवार यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. या घडामोडी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार आणि नारायण राणे हे उपस्थित होते. 


महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, खासदार शरद पवार, खासदार नारायण राणे इतर आमदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी शरद पवारांनी लढा दिला आहे. दोन राज्यांमधील हा वाद अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे


*सीमाप्रश्नी महत्त्वाची बैठक, काय ठरले?*


महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमाप्रश्नावर उच्चाधिकार समितीची विशेष बैठक विधिमंडळाच्या मंत्रिमंडळ बैठक सभागृहात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्याचे निश्चित करण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या विधानभवनातील कक्षात येऊन सदिच्छा भेट घेतली. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक संपल्यावर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पवार साहेबांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Post a Comment

0 Comments