✍️ भवन लिल्हारे प्रतिनिधी📱 मो. नं.9373472847 / 8888519894
राजुरा : (दिनांक १८ जुलै )इन्फंट जीजस सोसायटीद्वारे संचालित इन्फंट जीजस हायस्कूल, राजुरा येथे लोकशाही मूल्यांची जोपासना आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थी परिषदेची निवडणूक दि. १५ जुलै २०२६ रोजी मतदान पद्धतीने पार पडली. या निवडणुकीत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. दि. १६ जुलै रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा दि. १८ जुलै रोजी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शालेय प्रार्थनेने झाली. यावेळी सीबीएसई विभागाचे हेड बॉय अंशुल ताजने, स्टेट विभागाचे हेड बॉय वत्सल उपरे, सीबीएसई हेड गर्ल संस्कृती देवाळकर, स्टेट हेड गर्ल मावीया नाज हुसेन, सीबीएसई पंतप्रधान आयुष्य येरणे, स्टेट पंतप्रधान लखन उपरे, सीबीएसई शिक्षणमंत्री अविका चिंचोलकर, स्टेट शिक्षणमंत्री तेजस्विनी उलमाले, सीबीएसई सांस्कृतिक मंत्री स्वाती सागर, स्टेट सांस्कृतिक मंत्री साईश्वरी भोजेकर, सीबीएसई पर्यटनमंत्री यशस्वी सोनुले, स्टेट पर्यटनमंत्री अनाम पठाण, सीबीएसई आरोग्य व स्वच्छता मंत्री सिद्धार्थ बंडा, स्टेट आरोग्य व स्वच्छता मंत्री आरोही गौरकार, सीबीएसई कायदे व अनुशासन मंत्री विधान बनकर, स्टेट कायदे व अनुशासन मंत्री नम्रता बोटरे, सीबीएसई क्रीडामंत्री सुरज शाहा आणि स्टेट क्रीडामंत्री प्रणल आस्वले यांनी आपल्या पदाची शपथ स्वीकारली.नवनिर्वाचित मंत्रिमंडळातील सदस्यांना स्टेट शाळेचे मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींचे शाळेचे संस्थापक तथा माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू तसेच मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांनी अभिनंदन करून त्यांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी जबाबदारीने कार्य करण्याचा संदेश दिला. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व पदग्रहण सोहळा यशस्वी करण्यासाठी उमेश लढी, संतोष सागर, सोनाली कलुरवार, सुशील वासेकर, शाबास सर, शारीरिक शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुधीर सर व मेघा धोटे मॅडम यांनी केले, तर वर्षा बजाज मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. राज्यगीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments