मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
यवतमाळ :- पुसदच्या नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल माविमच्या लोकसंचालित साधन केंद्रांच्या वतीने आयोजित १६ वी सर्वसाधारण वार्षिक सभा व महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांचा अभिमान असून महिला बचत गटांनी पुसद तालुक्यात व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई नाईक यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध महिला बचत गटांना धनादेश, बियाणे, वृक्षरोपे वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अतुल इंगळे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, आदिवासी विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी कोटूरवार, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, पुसद रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय ठाकरे, केंद्राच्या अध्यक्ष, पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच या मेळाव्याला पुसद तालुक्यातील महिला बचत गटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

Post a Comment
0 Comments