✍️दिलीप करकरे ✍️
माणगाव, रायगड
7208708456
माणगाव:- पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. सत्य, न्याय आणि समाजहित यांचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आर्यरवी एंटरटेनमेंट आयोजित 'स्वाभिमान लेखणी पुरस्कार २०२६' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज टाइम्सचे मुख्य संपादक श्री. सचिन पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड, निष्पक्ष आणि सत्यनिष्ठ भूमिका घेत समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या व्यथा-समस्या प्रभावीपणे मांडण्याचे कार्य सचिन पवार यांनी सातत्याने केले आहे. कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता पत्रकारितेची मूल्ये जपत त्यांनी स्वाभिमानी लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य उभे केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
आर्यरवी एंटरटेनमेंटतर्फे पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, साहित्यिक, कलाकार आणि समाजसेवक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव दरवर्षी केला जातो. या पुरस्काराच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात येतो. यंदाच्या पुरस्कारासाठी सचिन पवार यांची निवड ही त्यांच्या निःस्वार्थ, धाडसी आणि लोकाभिमुख पत्रकारितेची पोचपावती मानली जात आहे.
"विकली न जी कधी, झुकली न जी कधी, तीच लेखणी क्रांतीची मशाल बनून तेवते मधी!" या प्रेरणादायी ब्रीदवाक्याला साजेशी पत्रकारिता करत सचिन पवार यांनी सत्याचा आवाज बुलंद ठेवला आहे. समाजातील वंचित, पीडित आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने आपल्या लेखणीचा प्रभावी वापर केला आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल पत्रकार, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव असून, भविष्यातही अधिक जोमाने आणि निष्ठेने समाजहिताचे कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सत्य, स्वाभिमान आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपत समाजासाठी कार्य करणारे श्री. सचिन पवार यांना 'स्वाभिमान लेखणी पुरस्कार २०२६' जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments