मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- आज 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र जी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत निवेदने सादर केली.
यामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचे थकीत अनुदान, आणीबाणी काळातील लोकशाही सैनिकांच्या प्रलंबित मागण्या, रामबाग वन वसाहतीतील सिमेंट काँक्रिट रस्ता, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मिळणारी नुकसानभरपाई ₹25 लाखांवरून ₹50 लाख करण्याची मागणी, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय व कामांचे पारदर्शक वाटप, तसेच चंद्रपूरच्या वाढत्या वीज गरजेसाठी तिसरे 220/33 केव्ही EHV उपकेंद्र उभारण्यासह अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. चंद्रपूरच्या विकासासाठी, जनतेच्या हक्कांसाठी आणि प्रत्येक प्रलंबित प्रश्नाच्या समाधानासाठी माझा पाठपुरावा यापुढेही असाच सुरू राहील.

Post a Comment
0 Comments