Type Here to Get Search Results !

वांगेपली येथील शासकीय निवासी शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव व पालक सभा संपन्न



व्येकटेश चालुरकर 

तालुका प्रतिनिधी अहरी


अहेरी तालुक्यातील वागेपली येथील शाळेत पालक सभा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागांतर्गत वांगेपली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.कार्यक्रमानंतर पालक सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका डांगेवार या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून श्री आत्राम व श्रीमती गोडबोले मॅडम उपस्थित होत्या.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती डांगेवार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाबरोबरच विविध उपक्रमांची माहिती दिली. चालू शैक्षणिक वर्षात शाळेला अधिक उच्च स्तरावर नेण्याचा संकल्प व्यक्त करत, मागील वर्षातील उणिवा दूर करून उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, सौंदर्य प्रसाधने, बेडिंग साहित्य, शूज तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका विद्या दहागावकर यांनी केले. यशस्वीतेसाठी श्वेता येगलोपवार, सुप्रिया आलम,यश पडालवार,सुरज येमुलवार ,शिरिन येमुलवार, व कर्मचारी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments