मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विषयक समितीच्या सभापती श्रीमती मनिषा अतकरे यांनी आगामी गणेशोत्सवानिमित्त महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा, कृत्रिम विसर्जन टाक्यांची उभारणी, निर्माल्य संकलन व व्यवस्थापन तसेच स्वच्छता आणि अन्य आवश्यक नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची (ता. १७ जुलै) आढावा बैठक घेतली.
बैठकीत आगामी गणेशोत्सव अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी आवश्यक नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांना महानगरपालिकेमार्फत सर्व सेवा-सुविधा प्रभावी, नियमित आणि वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. राजेश भगत, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, तसेच नागपूर शहरातील सर्व दहा झोनचे झोनल अधिकारी आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments