Type Here to Get Search Results !

NEET-TET पेपरफुटीच्या निषेधार्थ मोहाडी तहसीलवर धडक! संविधानाची प्रत हातात घेऊन सरकारचा एल्गार!




✍️ भवन लिल्हारे भंडारा,गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847 /8888519894


भंडारा (मोहाडी) : ( दिनांक २१ जुलै २०२६ )

देशभरातील NEET आणि महाराष्ट्रातील TET परीक्षेतील भीषण पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज मोहाडी तहसील कार्यालयासमोर व्यापक आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात आज एक आगळावेगळा प्रकार पाहायला मिळाला. आंदोलकांनी हातामध्ये भारतीय संविधानाची प्रत घेऊन संविधानाची महत्ता सांगत, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या बेजबाबदार सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.


*पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप*

दिवस-रात्र अभ्यास करून परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे भवितव्य या पेपरफुटीमुळे धोक्यात आले आहे. भारताचे भविष्य होऊ पाहणाऱ्या या तरुण पिढीच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या या सरकारविरोधात उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा देत, स्थानिक पातळीवरही हा लढा तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या संदर्भात माननीय पंतप्रधान यांच्या नावे असलेले निवेदन मोहाडीच्या तहसीलदारांमार्फत सादर करण्यात आले.


*सर्वपक्षीय आणि विविध संघटनांची मोठी उपस्थिती*

या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि AISF (ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन) नगर विकास संघर्ष समिती मोहाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*आंदोलनात प्रामुख्याने उपस्थित मान्यवर*

या प्रसंगी तालुकाध्यक्ष हंसराज आगाशे, माजी सभापती देवा निखारे, पंचायत समिती सदस्य कैलास झंझाड, शिवसेना (उबाठा) चे ओमप्रकाश ठोंबरे व रूपेश झंझाड, विजय शहारे, बबलू सैय्यद अनिल न्यायखोर,पुरुषोत्तम पात्रे ,शाम साठवने, गौरव नवरखेले, रवींद्र बाभरे, सेवक चिंधालोरे, बालचंद बोंदरे, महेश निमजे, रोहित पडोळे, जगन गोमासे, बलवंत पंचबुद्धे, राजेश निंबार्ते, एन. टी. तितिरमारे, बबलू मलेवार, मनोहर बुराडे, विजय बोदरे, विनोद साठवने, विलास वाडीभस्मे, राजन बोंदरे, कामरेड बावने, किशोर भैरम, आदर्श बडवाईक, समृद्ध भैरम, श्रेयस बन्साड, प्रवीण झंझाड, लिल्हारे, रूपचंद बांते, अरुण मुटकुरे, विनोद पिंगरे, सलीम शेख, पुरुषोत्तम पातरे, रवी थोटे, का. बबलू नानापूर, के. बी. चौरागडे, गजानन समरीत, निखिल खोब्रागडे, श्रीकांत भजे, सचिन राखडे, देवानंद साहूसाखरे, अरुण समरीत, हिरालाल समरीत, अरुण सेलोकर, किरण झंझाड, अजबराव गराडे, अशोक मुटकूरे,अफरोज पठाण, सुरेंद्र बारई, अंकुश दमाहे, कैलास भगत, महेश कळंबे, मधुकर पटले, स्नेहल कळंबे, कपिल पुंडे, राधेश्याम बांडेबुचे, सेवकराम सार्वे, गुरुप्रसाद सेलोकर, विनायक मारवाडे यांच्यासह परिसरातील शेकडो आबालवृद्ध, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments