Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाची रक्तदान शिबिरांनी उत्साहात सुरुवात!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या चार शिबिरांमध्ये तब्बल ३४३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश दिला.


आज विविध रक्तदान शिबिरांना भेट देत रक्तदात्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समाजहिताच्या भावनेला सलाम केला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजोपयोगी कार्यातूनच आपली सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, हा विश्वास यावेळी अधिक बळकट झाला.


२३ जुलैपर्यंत सेवा सप्ताहाअंतर्गत मतदारसंघात ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरे तसेच आरोग्य, धार्मिक, सामाजिक आणि विविध जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सेवा आणि समर्पणाचा हा संकल्प अधिक व्यापक करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे, असे मी आवाहन करतो.

Post a Comment

0 Comments