Type Here to Get Search Results !

किसान दिनानिमित्त कर्जवाटप मेळावे Ø बँक ऑफ इंडियाचा उपक्रम



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166962/9860020016


चंद्रपूर, दि. 20 : -किसान दिनाचे (19 जुलै) औचित्य साधून बँक ऑफ इंडियाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील बँकेच्या 37 शाखांमध्ये कर्ज मेळावे घेऊन कर्जवाटप करण्यात आले. शिवाय कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान, तसेच नवीन कर्जदारास मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले.


शेती विषयक आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कर्ज दिले जातात. या वर्षी किसान दिवस कर्ज मेळाव्यास विशेषतः बचत गटाच्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोबतच बचत गटांना कर्ज घेण्यास मदत करणाऱ्या मदतनीशी ‘बँक सखी’ यांचा सुद्धा प्रमाणपत्र देऊन सम्मान्न करण्यात आला.


जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक शेखर सोनोने यांनी बँक ऑफ इंडियाच्या वनसाडी, उपरवाही, पंढरपवनी, राजुरा, बामणी (बल्लारपूर) येथे किसान दिवस कर्ज मेळाव्यास उपस्थिती दर्शवून नियत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व बचत गटाला कर्जमंजुरी पत्र दिले. यावेळी त्यांनी शेतकरी, महिला यांना बँकेच्या विविध कर्ज योजनेविषयी माहिती दिली आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुध्दा केले.

Post a Comment

0 Comments