Type Here to Get Search Results !

परभणीत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला गती;




तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी बीएलओंच्या  कामकाजाची केली प्रत्यक्ष पाहणी


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


परभणी, दि. ४ : - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत ९६-परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालय परभणीच्या वतीने प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेण्यात आल्या.


तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. संदीप राजपुरे, सहाय्यक महसूल अधिकारी  मदन चव्हाण तसेच निवडणूक विभागाचे ऑपरेटर  बाळासाहेब साळवे यांनी दिनांक ४ जुलै २०२६ रोजी परभणी शहरातील विविध मतदान केंद्र क्षेत्रांना भेट देऊन BLO यांच्याकडून सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.


यावेळी BLO यांना प्रत्यक्ष क्षेत्रस्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी व समस्यांची माहिती घेण्यात आली. तसेच मतदार यादी पुनरिक्षणाशी संबंधित विविध बाबींवर आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. कामकाजात येणाऱ्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना सुचवून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे काम निर्धारित वेळेत, अचूक व प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


मतदार यादी अधिकाधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने कार्य करून निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments