✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा गोंदिया📱 मो.नं.9373472847 / 8888519894
गोंदिया (गोरेगाव ) : ( दिनांक ८ जुलै २०२६ ) सहकारातून समृद्धी म्हणजे एकमेकाच्या सहकार्याने सामूहिक प्रयत्नाने व आपसी समजूतदार प्रयत्नेनेच व आपसी सामंजस्य विश्वासाने सर्वांनी समोर जाणे व विकास साधणे होय. सहकार्याच्या भावनेतूनच व्यक्तिविकास व समृद्धी होऊ शकते असे ठाम मत जिल्ह्याचे किसान व सहकार नेते श्री रेखलाल भाऊ टेंभरे यांनी मत व्यक्त केले. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश विविध कार्यकारी सेवा सहकारी संघाची गोरेगाव तालुका बैठक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गोरेगाव शाखेत पार पडली. यावेळी कार्यालयात जिल्हा बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, डोमाजी बोपची अध्यक्ष वि.का. सेवा सहकारी चा संघ गोंदिया जिल्हा , मा. उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव चे श्री वेंकट भाऊ कटरे, श्री पुणेश बोपचे अध्यक्ष सेवा संस्था बोटे, प्यारेलाल गौतम अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी, श्री शंकर पटले सदस्य वि.का. सेवा सहकारी संघ, बाबा कटरे अध्यक्ष वि. का. सेवा सहकारी संस्था कावलेवाडा, देवचंद बिसेन अध्यक्ष दवडिपार, बावनकर अध्यक्ष मोहगाव, तानू भाऊ पारधी अध्यक्ष सोनेगाव, मुनेश टेंभरे अध्यक्ष बोरगाव, धनलाल बिसेन अध्यक्ष पिंडकेपार ,पटले अध्यक्ष तिमेझरी, मुकेश खरोले कलपाथरी, सुरेंद्र पटले तेढा, आदि प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते. गोंदिया जिल्हा सहकारी मंडळ मर्यादित गोंदिया र. नं.१०५ ता. जि. गोंदिया संचालक मंडळाची निवडणूक सन २०२६ ते २०३१ करिता निवडणूक सुरू आहे करिता १५ जून २०२६ प्राप्त नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक स्तरावरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे प्रत्येकी तालुक्यात १ प्रतिनिधी ची निवड करायची होती. त्यात गोरेगाव तालुक्यात एकूण ४ उमेदवारी आवेदन केले होते व निवडणूक घेणे अटळ होते निवडणूक म्हटले की आपसी वयमनस्य अधिक वाढतात व आपसी भांडण तंटे होण्याची दाट शक्यता असते अशात तालुक्यातील सर्वच प्रतिनिधींनी सहकार महर्षी श्री रेखलाल भाऊ टेंभरे यांचे अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन केले व आपसी सामंजस्याने तालुक्याचे प्रतिनिधी निवडण्याची पूर्ण अधिकार सहकार नेते रेखलाल भाऊ टेंभरे यांना दिले यात श्री रेखलाल भाऊ टेंभरे यांनी सर्वांचे मत जाणून भविष्यात विशाल वाद निर्माण होऊ नये व आपसी बंधुभाव कार्यक्षम राहावे या भावनेने सर्व सहमतीने श्री मूलचंद वाणुसा कटरे (बाबा कटरे) यांचे नाव सर्वानुमते श्री रेखलाल भाऊ टेंभरे यांनी घोषित केले व सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर श्री रेखलाल भाऊ टेंभरे मा. डायरेक्टर को-ऑपरेटिव्ह बँक व श्री दुर्गाप्रसाद ठाकरे संचालक को-ऑपरेटिव्ह बँक यांनी सभेला संबोधित केले. नंतर वि.का.सेवा सहकारी संस्था मोहगाव अध्यक्ष श्री. प्यारेलालजी गौतम यांच्या जन्मदिवस सोहळा केक कापून पार पाडण्यात आला व सर्वांचे आभार मानून बैठक पूर्ण झाली.

Post a Comment
0 Comments