नवनीत राणा या विषयावर मी बोलत नाही !
✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो. नं.9373472847 / 8888519894
भंडारा गोंदिया : दि. १८ जुलै रोजी नागपूर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा या अमरावतीच्या हनुमान गडीवर हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यावर उद्धवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी यावर नवनीत राणा हा चिल्लर विषय असल्याचा खोचक टोला लावत यावर अधिक बोलणे टाळले.
उद्धवसेनेतर्फे दि. १८ जुलै रोजी रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि.१६) दानवे हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत होते. राममंदिरावर भारतीय जनता पार्टीच्या कंट्रोल असल्याचा आरोप दानवे यांनी केला. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री जरी उपमुख्यमंत्री सुनिता पवार असल्या तरी बीड जिल्ह्याची पालक मी आहे, असे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. यावर आमदार अंबादास दानवे यांनी त्यांचीच अळवा आणि त्यांचीच जिरवा" असे सगळीकडे चालू आहे. गोंदिया जिल्ह्यात पण आणि राज्यात पण राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप जिरवते आणि भाजप राष्ट्रवादी जिरवते अशी परिस्थिती असल्याचा खोचकटोला दानवे यांनी लावला.
*तर सर्व पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना बंगला द्यावा*
उपसभापती सचिन अहिर यांच्याकरिता सरकारी बंगल्यावरून वाद सुरू आहे. त्यावर बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले सचिन अहिर यांना जो बंगला देण्यात आला होता तो भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात आहे. जर भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला बंगला देत असेल तर सगळ्याच पक्षाच्या अध्यक्षाला बंगला देण्यात यावा. हे सर्व जनतेच्या मालकीच्या आहे आणि भाजपा अशाप्रकारे त्यांना बंगला देत असेल तर ही चूक आहे.

Post a Comment
0 Comments