✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव, रायगड
7208708456
माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देगाव (कोडं) येथील सुपुत्र विजय शंकर इंगळे यांना समाजसेवा व पुस्तक बांधणी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'आदर्श समाजसेवक : उत्कृष्ट उद्योजक (पुस्तक बांधणी क्षेत्र)' या विभागातील 'वंदे मातरम् सन्मान गौरव पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला.
मैत्री संस्था व युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन, ऑगस्ट क्रांती दिन व मैत्री दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विजय शंकर इंगळे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार दिलीप सेन, दैनिक मुंबई मित्रचे संपादक व कामगार नेते अभिजीत राणे, विलास खानोलकर, संभाजी जाधवराव, अनघा राणे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
विजय शंकर इंगळे यांनी समाजसेवा आणि पुस्तक बांधणी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल देगाव (कोडं) गावासह संपूर्ण माणगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Post a Comment
0 Comments