मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त आयुष्मान कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ज्या नागरिकांनी नोंदणी केली, त्या नागरिकांना आयुष्मान भारत - महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्डचे वाटप करण्यात आले.
गरजू तसेच ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे मोफत आणि दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारात पोहोचवणे, हेच आमचे ध्येय आहे. या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी आपले आरोग्य सुरक्षित करण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. सुभाषजी धोटे, चंद्रपूर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments