Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे वतीने पद्मश्री डॉ. परशुरामज़ी खुणे यांचा सत्कार.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

31 ऑगस्ट 2026 गडचिरोली 

गडचिरोली. राष्ट्रीय मानवाधिकार संघटन महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने झाडीपट्टीतील नामवंत नाट्य कलावंत व गडचिरोली जिल्ह्यचे पद्मश्री डॉ.परशुरामजी खुणे यांचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कार्यालय गोविंदपूर सदिच्छा भेट दिल्या बद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये करण्यात येणाऱ्या विविध कामाबद्दल माहिती जाणून घेतली व त्यांनी संघटनेस पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या व मानवाधिकार संघटनेस गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा अधिक जोमाने सामाजिक काम करण्याबाबत काही सूचना व निर्देश दिले,यावेळी 

संघटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, गडचिरोली जिल्हा मानवाधिकार संघटना अध्यक्ष रमेश अधिकारी, भामरागड तालुका मानवाधिकार संघटना अध्यक्ष भीमराव वनकर यांनी त्यांचा सत्कार व स्वागत केला यावेळी विवेक बुद्धे, देवानंद पाटील खुणे,

राकेश खुणे, सुदाम पाटील खुणे 

संदीप भोवरे, अरविंद पाटील डोंगरवार,किशोर खुणे,नितेश भाऊ खुणे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments