Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

दाभा येथे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शुभारंभ!



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आज दाभा येथे आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. आज या शाळेचा पहिला दिवस होता आणि चिमुकले विद्यार्थी आपल्या पालकांसोबत मोठ्या उत्साहाने शाळेत दाखल झाले.  यावेळी शिक्षण सभापती श्रीमती संतोष देवी लढ्ढा यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी संस्थेचे मुख्य संयोजक श्री. सोमसुर्व  चॅटर्जी,, आकांक्षा फाउंडेशनचे प्राचार्यगण, शिक्षकवृंद व संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते. या नवीन शाळेच्या माध्यमातून दाभा परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची एक नवी संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांच्या या नव्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीस सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments