Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आंबा घाटाची आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पाहणी



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

रत्नागिरी : - अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात दरडी कोसळून रस्ता खचला असून, रस्त्याला भेगा पडल्याने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आंबा घाटाची आज प्रत्यक्ष पाहणी केली.

   यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र करपे, पोलीस उपाधिक्षक सुरेश कदम,जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, तहसीलदार अमृता साबळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments