Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू



या घटनेच्या निषेधार्थ आरमोरी येथे सर्व आदिवासी समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कॅण्डल मार्च 

    प्रज्ञा निमगडे 

आरमोरी शहर प्रतिनिधी 

मो.9595955155

आरमोरी :- आरमोरीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आरमोरी येथे सर्व आदिवासी समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कॅण्डल मार्च काढण्यात आला.

या कॅण्डल मार्चमध्ये आमदार रामदास मसराम, दिलीप घोडम, सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे, नगरसेविका मेघा मने, लता डोकरे, अमित केराम, नीलकंठ मसराम यांच्यासह आदिवासी समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

“आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड चालणार नाही. निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत काढण्यात आलेल्या या कॅण्डल मार्चमधून मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी आश्रमशाळांमध्ये सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याची मागणीही करण्यात आली.

Post a Comment

0 Comments