व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
9209982212
अहेरी तालुक्यातील देवलमरी येथील जुना प्रवासी निवारा अचानक कोसळून जमीन दोस्त झाला आहे. प्रवासी निवारा अनेक वर्षापूर्वी बांधकाम केलेला असल्याने जीर्ण अवस्थेत उभा होता. मात्र, रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू असताना कोसळला.
या प्रवासी निवाऱ्यावर नेहमी प्रवासी वाहतूक करत असतात. पूर्वी प्रत्येक गावात प्रवाशांच्या सेवेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवासी निवारा बांधकाम करीत होते. आजही
ग्रामीण भागातील प्रवासी अनेक ठिकाणी उन्ह, वारा, पावसाच्या वेळी प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतात. या ठिकाणीचा प्रवासी निवारा कोसळल्याने या ठिकाणी प्रवासी सुरक्षिततेची अडचण निर्माण झाली आहे.
संबंधित विभागाने कोसळलेल्या प्रवासी निवाऱ्याची पाहणी करून या ठिकाणी प्रवासाच्या सोयी करिता नवीन व सुरक्षित प्रवासी निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राकेश तोकला यांच्यासह देवलमरी येथील ग्रामस्थांनी केली

Post a Comment
0 Comments