मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
मो.8208166961/9860020016
नागपूर :-भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीच्या औचित्याने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने चिटणीस पार्क, महाल येथे ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. नागपूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन सादर करत देशभक्तीचा संदेश दिला.
कार्यक्रमास महापौर मा. श्रीमती निता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, शिक्षण विभाग समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, विधी विशेष समिती उपसभापती श्री. संजय बालपांडे, क्रीडा विशेष समिती उपसभापती श्री.संजय चावरे, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना महाजन, तसेच क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांची उपस्थिती होती.
‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Post a Comment
0 Comments