Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राज्यमंत्री, सहपालकमंत्री ॲड, आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संगीता ठलाल यांचा सन्मान



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

कुरखेडा :- मूळ गाव देऊळगाव/  कुरखेडा येथील रानभाज्यांची अभ्यासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांच्या वतीने  जिल्हा स्तरीय  रानभाजी महोत्सवात त्यांना, रानभाज्यांच्या विषयी माहिती व त्याचे फायदे या विषयावर बोलण्यासाठी वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सोबतच पाक कला आणि रानभाज्यांचे परीक्षण करण्यासाठी सुद्धा त्यांना परीक्षकाचा मान देण्यात आला होता.संगीता ठलाल यांनी "रानभाज्यांच्या जगात" संशोधन ग्रंथ काढून  रानभाज्यांवरील पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करून समाजापर्यंत पोहोचवून जनजागृती केली या महान समाजकार्याची दखल घेऊन गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री, राज्यमंत्री  ॲड आशिष जयस्वाल यांनी संगीता ठलाल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला व या कार्याविषयी आर्थिक  मदत  लागली तर ती मदत पूर्णपणे  केली जाईल असा  शब्द दिला व त्यांनी आपला प्रवास सुरूच ठेवावा म्हणून  त्या़ंचे अभिनंदन करून त्या समाज कार्याचे कौतुक केले. त्या शुभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले कृषी अधिक्षक प्रीती हिरळकर, मधुगंधा जुलमे, डॉ.किशोर झाडे,सुहास गाडे अन्य मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचा सहपालकमंत्र्यांच्या हस्ते  सत्कार झाल्याबद्दल सर्वच स्तरावर त्या़ंचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments