अमान कुरेशी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सिंदेवाही : - भेंडाळा ते पळसगाव या मार्गावर गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याचे पाईप टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र, या कामानंतर रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या विध्यार्थी तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा खड्डा अपघाताला आमंत्रण देणारा ठरत होता.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच गावातील युवकांनी पुढाकार घेतला.तंटामुक्ती अध्यक्ष व उपसरपंचांच्या मदतीने युवकांनी एकत्र येत हा मोठा खड्डा बुजविला. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासकीय कामानंतर रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे. प्रशासनानेही अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी पाईपलाईनच्या कामानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
यावेळी उपसरपंच त्रिशरण, तंटामुक्ती अध्यक्ष सुमित डांगे, अजित मुरकटे, भूषण बन्सोड, जितेंद्र नागदेवते, अनिल उईके, प्रशांत नागदेवते, नयन बन्सोड, अंकुश बन्सोड, सोनू नागदेवते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी अमान कुरेशी
चंद्रपूर जिल्हा

Post a Comment
0 Comments