जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी
चंद्रपूर नागभीड
नागभीड : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागभीड येथील N.G.G. इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
“झाडे लावा, झाडे जगवा” या संदेशासह विद्यार्थ्यांनी विविध रोपांची लागवड करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संचालक तथा प्राचार्य डार्विनकोब्रा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व सांगत वृक्ष लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते शाहरुख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदूषण आणि जंगलतोडीमुळे पर्यावरण धोक्यात आले असून, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी रौनक मेश्राम, स्मित घोडमारे, पियल कावळे, वेद पाथोडे, माही हलदार, मयंक करूडकर, वृशभ राखडे, रिद्धि मालोदे, अमन डहारे यांच्यासह विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.
लिना बांगडे आणि पूजा पाडंव यांनी स्वयंस्फूर्तीने झाडे भेट देऊन उपक्रमाला हातभार लावला.
शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी झाला.
झाडे लावा… झाडे जगवा… आणि पर्यावरण वाचवा!

Post a Comment
0 Comments