✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.8888519894 /9373472847
भंडारा :( दिनांक १६ आगष्ट२०२६ ) शहरातील शुक्रवारी नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात भर दुपारी नंग्या तलवारी झळकवित ७ ते ८ गुंडांनी पाठलाग करून एका २५ वर्षीय युवकाच्या खुनाचा प्रयत्न केला. मात्र कानावर आणि मानेवर वार झेलून पळ काढल्याने व एका घरात आश्रय घेतल्याने तो बचावला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (१४ ऑगस्ट) दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली. कचरा उर्फ विक्की उर्फ अमित सुधाकर चोपकर असे जखमी युवकाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहितीनुसार, अमित चोपकर हा शुक्रवारी परिसरातील विघ्नहर्ता हॉटेलजवळील चौकात दुचाकी उभी करून मित्राशी बोलत अचानकपणे ७ ते ८ च्या संख्येतील गुंडांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला चढविला. त्यामुळे दुचाकी तिथेच सोडून त्याने पळ काढला. या दरम्यान त्याच्यावर वार झाल्याने कानामागे आणि मानेवर गंभीर जखम होऊन तो रक्तबंबाळ झाला. अशाही स्थिती पळून एका घरात आश्रय घेतल्याने तो बचावल्याचे सांगितले जाते.
नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठले. जखमी अमितला रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
हल्ला झालेल्या अमित चोपकरची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती आहे. काही गंभीर गुन्ह्यामध्ये त्याच्या नावाची नोंद पोलिसात असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment
0 Comments