Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

भारतीय बौद्ध महासभा बाळापुर तालुक्याच्या वतीने ग्रंथ पठणास भेट



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

बाळापूर :- दरवर्षीप्रमाणे बौद्ध धम्मा मध्ये पावसाळ्यामध्ये अडीच हजार वर्षांपूर्वीची वर्षावासाची परंपरा कायम असून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पोर्णिमा या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये धम्म उपासक उपासिका आपल्या येथील बौद्ध विहारांमध्ये धम्मग्रंथ पठणाचे आयोजन करतात आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये तीन महिने धम्मविनयाचे आचरण करून आपले जीवन मंगलमय करतात 

  भारतीय बौद्ध महासभा  बाळापुर तालुक्याची कार्यकारणी ज्या ज्या विहारांमध्ये ग्रंथाचे पठण चालू असते त्या विहारांमध्ये जाऊन ग्रंथ पठण करून धम्माचा प्रचार आणि प्रसार अधिक गतिमान करण्याचे काम करतात आणि धम्मग्रंथामध्ये जाऊन जिल्ह्याच्या आदेशाने प्रवचन मालिका सुद्धा राबविण्यात येत आहे यामध्ये तालुक्यामधून अंदुरा या गावापासून सुरुवात करून आतापर्यंत अंदुरा, बोरगाव वैराळे,नया अंदुरा,हाता, सागद, टाकळी निमकरदा, हसनापूर, निम्बी,  कवठा, टाकळी खुजबळ, उरळ खुर्द (रतनपुरी), कडोशी, खंडाळा, निंबा, पारस, व्याळा या गावांना भेटी देऊन प्रवचन मालिकेतील तीन विषय घेण्यात आले यामध्ये आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमा, भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत, आणि बौद्ध लेणी,शिलालेख व स्तंभलेख या विषयावर प्रवचन मालिका सुद्धा राबविण्यात आली.    भेटीदरम्यान ग्रंथ वाचक पूज्य भंते धम्मदीप ,हिम्मत शेगोकार, भिकनराव घ्यारे, माणिकराव वानखडे, नितीन वाकोडे,विपुल पाचपोर, बबीता निखाडे,वर्षा सत्यपाल वानखडे,विश्वपाल शिरसाट, संध्याताई भारसाकडे, प्रणव सरदार, कु कोमल भटकर, रवी तायडे, देविदास पाटील, धम्मपाल तायडे, राजू डोंगरे कविताताई मोरे कुमारी प्राजक्ता वानखडे रामभाऊ खंडारे गुरुजी  इत्यादी ग्रंथवाचकांनी आपापल्या गावांमध्ये अतिशय मंगलमय वातावरणामध्ये ग्रंथ वाचन करत असून उपासक-उपासिकांची सुद्धा उपस्थिती चांगल्या प्रमाणात पाहण्यात आली   

 ग्रंथ भेटी दरम्यान आणि प्रवचन मालिका राबवत असताना भारतीय बौद्ध महासभा बाळापुर तालुक्यातील पदाधिकारी तालुका अध्यक्ष राहुल इंगळे सरचिटणीस सागर अनिल निखाडे उपाध्यक्ष साहेबरावजी वानखडे कार्यालयीन सचिव विश्वपाल शिरसाठ माजी तालुका अध्यक्ष प्रकाश दामोदर,सचिव डी जे वानखडे, विपुल पाचपोर, वसंता वानखडे संघटक राजू डोंगरे, संजय वानखडे,बाळकृष्ण वानखडे, मनोज सावळे,दीपक निळकंठ सैनिक प्रकाश वानखडे देवलाल वानखडे  रमेश वानखडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये भेटी देऊन धम्माचा  प्रचार आणि प्रसार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments