Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन



सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा कुटुंबीयांशी फोनवर संवाद

नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी                                    

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856921

      एटापल्ली, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील दोलंदा येथे वाघाच्या हल्ल्यात ५७ वर्षीय हरी वड्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी घडली. घराबाहेर पडताच दबा धरून बसलेल्या वाघाने हरी वड्डे यांच्यावर अचानक हल्ला केला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटने वड्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.

शिवसेनेची सांत्वन भेट  

ही घटना कळताच सोमवार, १७ ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दोलंदा गावाला भेट दिली. यावेळी अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला,अक्षय पुंगाटी,अंकुश मंडलवार,अरुण शेडमाके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

शिष्टमंडळाने घटनास्थळाची पाहणी करून मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले आणि तातडीची आर्थिक मदत देखील दिली.

सहपालकमंत्री जयस्वाल यांचा हस्तक्षेप  

या घटनेची माहिती गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना देण्यात आली. त्यांनी वड्डे कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून धीर दिला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित प्रशासनाला नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश दिले.

वनविभागावर कारवाईची मागणी

दोलंदा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी वन विभागाने  तात डीने उपयोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे नरभक्षक वाघाचा बंदोबस्त न झाल्यास शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.   उपस्थित मान्यवर नामदेव हिचामी राघव सुलवावार. कैलास उसेंडी  विश्वनाथ जांभुळकर प्रशांत तलांडे बाळू आत्राम. नथू दूर्वा रिषभ दुर्गे महादेव हिरा मिरवा मट्टामी  सुमित करमरकर  सचिन गेडाम सुरेश तलांडे अमर विश्वास वैभव सुमनकर आदित्य चिपावार आदी.

Post a Comment

0 Comments