तळा -किशोर पितळे- (प्रतिनिधी)
तळा :- तळा बस स्थानकात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या तर्फे २०आँगस्ट२६ रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.तहसीलदार स्वाती पाटील, नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे पंचायत समिती उपसभापती रवींद्र मांडवकर,शेतकरी संघटना अध्यक्ष चंद्रकांत रोडे, सचिव कैलास पायगुडेयांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी महंमदभाई परदेशी, नथुराम वरंडे कृष्णा चाळके उपस्थित होते महोत्सवात जवळपास २०/२५ प्रकारच्या रान भाज्या मध्ये भारंगा, शेवगा, टाकळा,भाजीचा आळू,वडीचा आळु,कुडा शेग,खवणीभाजी, सुरण,माठ तांबडा माठ,इंन्शुलिन प्लांट (डायबेटीस)हे खास आकर्षण होते अशा अनेक प्रकारच्या भाज्या प्रदर्शनात आणल्या होत्या प्रत्येक रानभाजीचे आरोग्यासाठी असणारे महत्व सविस्तर फलक लावण्यात आले होते.या महोत्सवाचा मुख्य उद्देश रानभाज्या बद्दल आयुर्वेदात आरोग्यासाठी किती महत्त्वाचे स्थान आहे. शाश्वत वापरासाठी प्रोत्साहन, संवर्धन व जन जागृती व रानभाजी बद्दलस्थानिकांच्या माहिती संकलन हा असून कृषी विभागाने विषेश प्रयत्न केला आहे. आरोग्यासाठी रानभाज्या चांगल्या असून सिझन प्रमाणे उपलब्ध असणाऱ्या भाज्याचा वापर जेवणात करावाव तंदुरुस्त रहावे असे तालुका कृषी अधिकारी कांबळे यांनी सांगितले यावेळी कृषीमंडळ अधिकारी,कृषी सहाय्यक व तालुक्यातील शेतकरी वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments