Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016

लातूर : - रंगरूट प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), लातूर येथे आर.सी.डब्ल्यू.ए.च्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. आरसीडब्ल्यूएच्या अध्यक्षा बसमी शौकत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अधिकारी व जवानांच्या कुटुंबातील महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

आरटीसी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षण, हरित क्षेत्राचा विस्तार आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

यावेळी बसमी शौकत यांनी ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments