Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

भामरागडमध्ये लवकरच हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण; गडचिरोलीच्या निसर्गाला मिळणार राष्ट्रीय ओळख



व्येकटेश चालुरकर 

तालुका प्रतिनिधी अहेरी 

9209982212

अहेरी. 26 नोव्हेंबर, ‘निर्धार’ आणि ‘बिराड’नंतर आता थेट हिंदी चित्रपटासाठी भामरागडची निवड गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेल्या भामरागड परिसराची आगामी हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. फोरफॉक्स स्टुडिओ, मुंबई निर्मित या चित्रपटाचे लवकरच भामरागड परिसरात चित्रीकरण सुरू होणार असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सचिन शोभा उराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

26 नोव्हेंबर निर्धार’ आणि ‘बिराड’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता गडचिरोलीतील भामरागडची थेट हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निवड झाली असून चित्रपटाच्या लोकेशन पाहणीसाठी लेखक-दिग्दर्शक सचिन उराडे व त्यांची टीम भामरागड परिसरात येणार आहे. या चित्रपटात मल्याळम अभिनेता अमल क्रिश, अभिनेत्री श्रीजीता घोष, तसेच जगपती बाबू, रवि किशन, आशुतोष राणा, सयाजी शिंदे, राहुल देव आणि गणेश यादव यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. विविध भाषांतील प्रसिद्ध कलाकारांमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

गडचिरोलीतील कलावंतांना संधी चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत स्थानिक कलाकार व कलावंतांनाही संधी मिळणार आहे. संतोष म्हशाखेत्री, उमेश सूर्यवंशी यांच्यासह साई चंदनखेडे यांच्यावर चित्रपटातील महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.दीपक बारसागडे व पंकज नंदगिरीवार यांच्याशी चर्चा चित्रपटाच्या संभाव्य लोकेशन, स्थानिक सहकार्य, पर्यटनाच्या संधी तसेच गडचिरोलीतील कला व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बारसागडे यांची साई चंदनखेडे यांच्यासह भेट घेण्यात आली.

तसेच TRIBee Tours चे संस्थापक पंकज नंदगिरीवार यांचीही भेट घेण्यात आली. यावेळी भामरागडसह गडचिरोलीतील निसर्गरम्य स्थळे, स्थानिक पर्यटन आणि चित्रपटाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणाऱ्या संधींबाबत चर्चा झाली.

Post a Comment

0 Comments