त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नशामुक्त भारत अभियान अंतर्गत शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीच्या वतीने स्व . निर्धन वाघाये पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लाखनी येथे दि. 13/08/2026, रोजी व्यसनमुक्ती व उपचार मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून, मार्गदर्शनाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे सर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष मा. गंगाधर धुवाधपारे सर यांनी चांगल्या गोष्टींचे नेहमी व्यसन करा, पण चुकीच्या गोष्टींचे किंवा अमली पदार्थांचे व्यसन नको याबद्दल मार्गदर्शन केले. मा. उषा घोडेस्वार (प्रकल्प संचालिका उज्वल व्यसनमुक्ती केंद्र, साकोली) यांनी व्यसनामुळे होणारे विविध दुष्परिणाम समजावून सांगून दारूमुळे होणारे आजार किती गंभीर स्वरूपाचे असतात व व्यसनमुक्तीसाठी काय उपचार केले जावे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उज्वल व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक मा. शिलवंत घोडेस्वार सर यांनी उपस्थित सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन , ना मी नशा करणार, ना कुणाला करू देणार, नशा जीवनाची करी दुर्दशा अशी घोष वाक्य दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. गणेश कापसे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनातून विद्यार्थ्यांना व्यसनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सीमा बावनकर (आरोग्य विभाग, लाखनी) यांनी आरोग्य विषयक माहिती दिली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे सर, प्रा. डॉ. चंद्रशेखर देवघरे सर, प्रा. डॉ. योगेश करवाडे सर, प्रा. डॉ. शहारे सर, प्रा. डॉ. शेंडे सर, प्रा. डॉ. डोंगरे सर, प्रा. डॉ. टिचकुले सर, प्रा. डॉ. धर्मेंद्र सिंग सर, प्रा. प्रमोद भोयर सर, श्री. कुकडे सर, रहांगडाले मॅडम, मनिषा सपाटे मॅडम, तितरमारे मॅडम, श्रद्धा बोरकर मॅडम, वलथरे मॅडम, डोंगरावार मॅडम व 250 हून अधिक विध्यार्थी व संपूर्ण कर्मचारी गण उपस्थित होते. या मार्गदर्शनाला शिक्षक व विध्यार्थांचे अतिशय सकारात्मक सहभाग लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे सर यांनी अतिशय उत्कृष्ठरित्या केले, तसेंच उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. योगेश करवाडे सर यांनी व्यक्त केले.
सर्व मान्यवर व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत हा जनजागृती कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडला.

Post a Comment
0 Comments