Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जनजागृती सेवा संस्था आयोजित रक्षाबंधन सोहळ्यास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


            

ठाकुर्ली  प्रतिनिधी

गुरुनाथ तिरपणकर

मो. 9323662619

ठाकुर्ली :- जनजागृती सेवा संस्थेच्या पुढाकाराने  बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी ठाकुर्ली येथील रेल्वे सुरक्षा बल (RPF) बारावी बटालियनच्या छावणीला भेट देण्याचे सौभाग्य लाभले.

रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अहोरात्र सेवा बजावत असल्यामुळे लाखो नागरिक सुरक्षितपणे रेल्वे प्रवास करू शकतात. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेचे रक्षण करणारे आपले वीर जवान देशाचे संरक्षण करत असल्यामुळे आपण सुरक्षित जीवन जगू शकतो. त्यांच्या या निस्वार्थ आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने जनजागृती सेवा संस्थेच्या महिला भगिनींनी आरपीएफच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा स्नेहबंध दृढ केला.रेल्वे सुरक्षा बलाचे ASI(व्यवस्थापक)राजू कुमार सिंह यांचे या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.तसेच निरिक्षक आर.के.पाण्डे, निरिक्षक दिनेश कुमार, निरीक्षक सुनीता जाधव ,सहाय्यक उपनिरीक्षक राजू कुमार सिंह हे उपस्थित होते.

या प्रसंगी अधिकारी वर्ग तसेच बटालियनमधील जवानांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने रक्षाबंधनाचा हा उत्सव साजरा केला. जवान आणि भगिनी यांच्यातील हा भावनिक क्षण सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जनजागृती सेवा संस्थेच्या खजिनदार सौ. श्रुती उरणकर मॅडम यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते कैलास सणस, सचिन उबाळे आणि संदेश कदम यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

रक्षाबंधनाच्या या विशेष रक्षाबंधन सोहळ्यासाठी डोंबिवली येथील नारी उन्नती सोशल फाउंडेशन, ओम साई महिला बचत गट, विश्वकर्मा महिला बचत गट,साई विठ्ठल महिला बचत गट, ओम साई महिला बचत गट,दशांकिनी महिला बचत गट, डोंबिवली पूर्व महिला मंडळ, मानिनी महिला मंडळ, जनजागृती सेवा संस्था महिला गट अशा विविध संस्थांच्या महिला उपस्थित होत्या.तसेच ठाकुर्ली येथील विस्तीर्ण पसरलेल्या हिरव्यागार हिरवळीवर महिलांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करुन वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.

देशसेवा करणाऱ्या जवानांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!

रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वानिमित्त सर्व वीर जवानांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेचे जेष्ठ सल्लागार राष्ट्रपती पदक सन्मानित दिलीप नारकर, ॲंन्टीपायरसी सेल मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी रामजित(जितू) गुप्ता,उषा हाॅस्पिटलीटीचे संचालक अरविंद सुर्वे, समाजसेवक कैलास सणस, सेवा समाधान फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन फडकले आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवियत्री, निवेदिका सुनिता काटकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments