मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- अनेकदा असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या अस्थिव्यंग व कर्णबधीर प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींशी नि:शुल्क जयपूर फूट साहित्य व साधने मोजमाप व वाटप शिबिरात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी हृदयस्पर्शी संवाद साधला. शिबिरात लाभ प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी महापौरांपुढे आयोजकांचे मनस्वी आभार व्यक्त केले. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य व आनंदाची अनुभूती बघून आपले कार्य सार्थक झाल्याची भावना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विपीन, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर, मुख्यमंत्री सचिवालय येथील सहसचिव श्रीमती आशा पठाण, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्निल लोखंडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर व श्री. अभिजीत राऊत, यांच्यासह भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे श्री. नारायण व्यास, समन्वयक श्री. सुबोध भंडारी उपस्थित होते.
दिव्यांग, अंध, कर्णबधीरांना जयपूर फूटसह आवश्यक सहायक साहित्य देण्यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, नागपूर जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व टाटा ट्रस्टने संयुक्त विद्यमाने ७ ते १० ऑगस्ट दरम्यान शिबिर आयोजित केले आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह परिसरात आयोजित शिबिराला लाभार्थीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, सोमवार १० रोजी सकाळी ९ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याचे वाटप केले जाणार आहे. अशी माहिती महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.

Post a Comment
0 Comments