Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुपल्ली ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न



विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल क्र. 9421856931

गुरुपल्ली :- आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुपल्ली ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेमध्ये मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. त्यानंतर ग्रामसभा अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विविध विषय सभेसमोर मांडण्यात आले.

गुरुपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांतील रस्ते, पाणी, स्वच्छता, वीज, विकासकामे तसेच इतर विविध स्थानिक समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांची नोंद घेऊन त्या ठरावामध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.

तसेच मागील हिशोब-खर्चाचा तपशील आगामी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांसमोर सादर करण्यात येणार आहे

यावेळी उपस्थित गुरुपल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच मा. कैलास उसेंडी, सचिव मा. गेडाम मॅडम, उपसरपंच मा. बाळू भाऊ आत्राम, सदस्य मा. सत्तू गावडे तसेच शिवसेनेचे युवा नेते अक्षय भाऊ पुंगाटी, मा. नामदेव हिचामी, नत्तू दुर्वा आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments