Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न




✍️दिलीप करकरे ✍️

माणगाव, रायगड 

7208708456


श्रीवर्धन : रा. जी. प. प्राथमिक मराठी शाळा, कोलमांडले येथील सन २००३–२००४ च्या माजी विद्यार्थ्यांचा "शाळेच्या जुन्या आठवणी" ग्रुप आयोजित स्नेहमेळावा आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला.

अनेक वर्षांनंतर एकाच छताखाली जमलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. वर्गातील खोड्या, शिक्षकांचे मार्गदर्शन, शालेय उपक्रम, सहली आणि बालपणीचे अनेक प्रसंग आठवत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. अनेकांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली.

या स्नेहसंमेलनामुळे जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले. उपस्थितांनी भविष्यातही अशा भेटीगाठी नियमित आयोजित करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात परस्पर संवाद, छायाचित्रे, हास्यविनोद आणि आठवणींची देवाणघेवाण यामुळे वातावरण भावनिक आणि उत्साही झाले.

हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी "शाळेच्या जुन्या आठवणी" ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केलेल्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments