Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आमदार डॉ. श्री नितीन राऊत साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. श्री नितीन राऊत साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीमध्ये पदवीधर मतदार संघातील निवडणूक तयारी, संघटनात्मक बांधणी, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे नियोजन तसेच आगामी रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार श्री. अभिजीत वंजारी,युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव श्री कुणाल राऊत, शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री बंडोपंत टेंभुर्णेजी, माजी नगरसेवक श्री सुरेश जग्यासी, श्री सुरेश पाटील तसेच नगरसेवक, नगरसेविका व काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या मार्गदर्शनातून व सहकार्याने पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments