Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दुग्गीरालापाटी यांनी केले पत्रकातून मागणी.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी :- ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ पेन्शनचा लाभ मिळविताना जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) सादर करण्याची अट मोठी अडचण ठरत आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिक निरक्षर असल्याने त्यांच्याकडे शाळेचा दाखला उपलब्ध नाही. तसेच जुन्या काळातील जन्मनोंदी उपलब्ध नसल्यामुळे जन्म दाखला मिळविणेही कठीण जाते. त्यामुळे पात्र असूनही अनेक वृद्ध नागरिक पेन्शनच्या लाभापासून वंचित राहण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही म्हणून 

त्यामुळे शासनाने जन्म दाखला व टी.सी.ची अनिवार्य अट शिथिल करून, आधार कार्ड, मतदार यादीतील नोंद, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचा वयाचा दाखला किंवा वयाबाबतचे शपथपत्र यापैकी कोणताही विश्वासार्ह पुरावा ग्राह्य धरावा.

वृद्ध नागरिकांना कागदपत्रांच्या अडथळ्यामुळे शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनेपासून वंचित ठेवू नये.

मागणी : वृद्धापकाळ पेन्शनसाठी जन्म दाखला व टी.सी.ची अट तातडीने शिथिल/रद्द करून पर्यायी वयाचा पुरावा स्वीकारण्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश जारी करावेत.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दुग्गीरालापाटी केले 

महाराष्ट्रातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत ६५ वर्षे व त्यावरील पात्र वृद्ध व्यक्तींना लाभ दिला जातो आणि अर्ज तहसीलदार/तलाठी कार्यालयामार्फत करता येतो.

Post a Comment

0 Comments