Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात ‘नशामुक्त युवक व विकसित भारत’ अभियानांतर्गत जनजागृती



इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे 

विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब (वालचंदनगर) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘नशामुक्त युवक व विकसित भारत’ अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना ‘नशामुक्त युवक व विकसित भारत’ या विषयावर दिलेल्या प्रेरणादायी संदेशपर भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.अर्थशास्त्र विभागाचे प्रा. अमर नांदगुडे यांनी ‘नशामुक्त युवक व विकसित भारत’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनमुक्तीचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका यावर विवेचन केले.प्रा.नितीन रुपनवर यांनी स्वच्छता पंधरवड्यानिमित्त ‘स्वच्छतेचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वच्छ परिसर, स्वच्छ सवयी आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांचे मार्गदर्शन लाभले.प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी केले.अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. विजय केसकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून वेळेचा सकारात्मक उपयोग करण्याचे आवाहन केले.सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. तेजश्री हुंबे प्रास्ताविक व  आभार  प्रा. सचिन पवार यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments