मनोज एल खोब्रागडे
मुख्य संपादक
8208166961/9860020016
चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की दि.10 ऑगस्ट 2026 सोमवारला स्थायी समिती अध्यक्ष मनस्वीताई गिऱ्हे यांनी लालपेठ येथील तेलगू पूर्व प्राथ.शाळा लालपेठ तसेच डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी तेलगू हायस्कुल लालपेठ एकत्रितकरणाच्या विषयावर शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याची खोल्या/ वर्गाची,परिसराची तसेच शाळेतील अनेक अडचणी बघण्यासाठी मा.सभापती सौ.मनस्वीताई गिऱ्हे यांना शाळेला भेट देण्यासाठी विनंती केली .
मा. सभापती मॅडम नी आमच्या विनंतीला मान देऊन,11 ऑगस्ट मंगळवारला तात्काळ भेट देऊन शाळेला सुधारित करण्यासाठी योग्य निधी देऊ असे आस्वस्त केले.
यावेळी प्रभाग क्रमांक 16 नगर सेविका चंदाताई वैरागडे प्रभागातील नगरसेविका सौ.अनिताताई चौखे,सौ.करिष्माताई जंगम आणि श्री रेड्डी सर मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments